दुर्ग भेट
या वर्षी आपण रंगवर्धनचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत! अशा पावन वर्षाचे निमित्त साधून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून स्थापन केलेल्या 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' किल्ल्याला आपण भेट दिली. रायगडाच्या भव्यतेत इतिहास जिवंत होतो. दुर्गभ्रमण करत असताना आलेला प्रत्येक अनुभव, गडाच्या तटावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि पायथ्याशी पसरलेली हिरवळ, हे ह्या दुर्गभेटीचे मुख्य आकर्षण ठरले. या दुर्गभेटीदरम्यान, आम्ही पाचाड गावातील राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळालाही भेट दिली, ज्यामुळे त्यांच्या महानतेची आणि त्यागाची अनुभूती घेता आली. या ऐतिहासिक किल्ल्याच्या भेटीत शिवकालीन वारसा आणि निसर्गाची अपूर्व समृद्धता अनुभवण्याचा आनंद अविस्मरणीय ठरला.