वार्षिक महोत्सव

शुभारंभ

वर्षभर रंगवर्धन राबवत असणारे उपक्रम, त्याची माहिती देण्यासाठी आणि रंगवर्धनची सर्वांना ओळख करून देण्यासाठी आयोजित केला जाणारा सर्वात पहिला वहिला कार्यक्रम म्हणजे Launch ! या कार्यक्रमाला मोठे पाहुणे आमंत्रित करून त्यांच्या शुभहस्ते रंगवर्धनच्या प्रवासाला ते हिरवा कंदिल देतात आणि या सोहळ्यात संपूर्ण पारंपारिक पोशाखात नटलेलं VJTI !

Game night

प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांसाठी रंगवर्धन 'रंगा'त हा खेळ रंगला - Games Evening’ चा घाट घातला. एका पाठोपाठ एक खेळात सगळे भाग घेत गेले व त्यातून विजेते निवडण्यात आले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली गेली.

प्रश्नमंजुषा

वर्षभर रंगवर्धन राबवत असणारे उपक्रम, त्याची माहिती देण्यासाठी आणि रंगवर्धनची सर्वांना ओळख करून देण्यासाठी आयोजित केला जाणारा सर्वात पहिला वहिला कार्यक्रम म्हणजे Launch ! या कार्यक्रमाला मोठे पाहुणे आमंत्रित करून त्यांच्या शुभहस्ते रंगवर्धनच्या प्रवासाला ते हिरवा कंदिल देतात आणि या सोहळ्यात संपूर्ण पारंपारिक पोशाखात नटलेलं VJTI !

मराठी हस्ताक्षर स्पर्धा

ज्या मराठी भाषेत सर्वप्रथम बोलायला, विचार करायला शिकलो त्या मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी रंगवर्धन ‘मराठी हस्ताक्षर स्पर्धा’ आयोजित करतो. विद्यार्थ्याी या स्पर्धेत भाग घेत मराठी हस्ताक्षरांचे प्रदर्शन आपल्या लेखन कौशल्यातून सादर करून मराठीला जिवंत करतात व मराठी लेखणीशी जोडलेलं नातं व्यक्त करतात.

भटकंती

भटकंती महाविद्यालयाची , मस्तीची. सुरुवातीला fresher म्हणून आल्यावर आपल्याला पुर्ण campus कधीच माहीत नसतो. Campus चा कोपरा न कोपरा बघून नवीन लोकांबरोबर ओळख करून सांघिक कार्याचे प्रदर्शन अर्थातच Treasure Hunt. बुद्धीमत्ता आणि तर्क-वितर्क यांची सांगड घालत एक गट म्हणून कोडं सोडवताना VJTI ची सफर झाल्याशिवाय राहात नाही !

लेख आणि कविता लेखन राजभाषा

अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण करणाऱ्या मराठी राजभाषेची जाणीव ठेवत रंगवर्धन ‘लेख आणि कविता लेखन स्पर्धा’ हा उपक्रम करतो. या वर्षी "मातृभाषा मराठीचे जतन ही आजच्या काळाची गरज!" यावर विचार लेख आणि कवितांच्या माध्यमातून स्पर्धकांनी भरघोस प्रतीसाद दिला.

मराठी राजभाषा दिन

२७ फेब्रुवारी मराठी साहित्याचे मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिवस!दर वर्षी रंगवर्धन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करत आपल्या मातृभाषेचे गौरव म्हणून ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करतो.

मराठी स्वाक्षरी मोहीम

मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगवर्धन मराठी स्वाक्षरी मोहिम आयोजित करते. स्वतःची ओळख स्वतःच्या अक्षरात कागदावर उतरवणे म्हणजेच स्वाक्षरी! या युगात स्वतःची ओळख मराठीत सादर करत स्पर्धक या मोहिमेस एक वेगळाच तेज आणतात.

राजमाता जिजाऊ जयंती

जिजाऊंनी केलेल्या या संस्कारांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येक साली राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रंगवर्धन या थोर मातेस नमन करतो.

शिव जयंती

VJTI मध्ये रंगवर्धन समिती कार्यरत असताना शिवजयंती महोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे दोन्ही दिवस कार्यक्रम आखले जातात. कथा, कविता, भाषणे, पोवाडे, संगीत अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांतून अखंड हिंदूस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जाणारा ‘महाराष्ट्र दिन’. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यच्याची निर्मिती झाली व या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. महाराष्ट्र उभारणीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली देत रंगवर्धन महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करतो.

आपला कट्टा

स्वयंप्रकाशी तार्यालाही लुकलुकण्यासाठी आभाळाची साथ हवी असते , तसेच कलाकारांनाही नृत्य, संगीत, कथाकथन , हास्य , कवितापठण या सादरिकरनासाठी रंगमंचाची आवश्यकता असते आणि हेच व्यासपीठ आहे 'आपला कट्टा'. आपल्यातली कला प्रदर्शन करून सर्वांसमोर दाखवण्याची ही रंगवर्धनने दिलेली संधी सहसा कोणी सोडत नाही !

Social Drive

सांस्कृतिक वारसा जपत सामाजिक भान सुद्धा रंगवर्धन दरवर्षी जपत असतो. अनाथालय, वृद्धाश्रम अशा ठिकाणी भेटी देऊन तिथल्या निराधार लोकांना थोडासा आधार, मनोरंजन, विरंगुळा आणि भेटवस्तू देण्याचं काम प्रत्येक वर्षी रंगवर्धन करायला रंगवर्धन विसरत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून आपल्याला भरून आल्याशिवाय राहत नाही

अमृत महोत्सव

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आपल्या संस्थेत जे विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यांची माहिती आपणांस आहेच. या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग सर्वांसाठी निमंत्रित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.